क्षत्रिय मराठा समाज, मुंबई
96 कुळी मराठा समाजाचा सर्वांगीण विकास — 1974 पासून
आमची ओळख
सप्रेम नमस्कार, आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकास कार्याची मुहूर्तमेढ हेदवी गावच्या श्री दशभुज लक्ष्मी गणेशाच्या साक्षीने अन समाजातील तमाम बंधू भगिनींच्या सहकार्याने मौजे आबिटगाव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक ३ मार्च १९७४ रोजी जनता परिषदेच्या रूपाने रोवण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, लांजा इतादी तालुक्यांमध्ये विखुरलेल्या सुमारे ४० खेड्यांपाड्यातील जनतेला एकत्र आणून परस्पर सहकार्य, स्नेहभाव व बंधुभाव वाढवून त्यांची एक अभेद्य व अतूट अशी संघटना निर्माण करण्यात आली आहे. या संघशक्तीच्या आधाराने अनेक सामाजिक विकास योजना यशस्वीरित्या साकार करण्यात येत आहेत.
(संदर्भ : प्रतिनिधी अधिवेशन दिनांक २१ मे १९८३ ची पुस्तिका / अहवाल)
आपण समाजाला काय देऊ शकता?
- सामाजिक आस्था, एकनिष्ठता व बंधुप्रेम.
- कार्यक्रमात सक्रिय भाग व सहकार्य.
- कर्तव्याची जाणीव व पालन.
- निःस्वार्थ समाजसेवेचा आदर्श व भावी पिढीस उत्तेजन.
- कार्यकर्त्यांचा आपल्या दारी सन्मान व आदर.
- असाध्य विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत, पुस्तके, वस्त्रे, गणवेश वगैरे.
- कायम शिक्षण निधीसाठी स्मरण पारितोषिके.
- छात्रालय व सभागृह योजनेस उदारहस्ते आर्थिक मदत.
- सर्वसाधारण व आजीव सभासद, आश्रयदाते व देणगीदार.
- विवाह प्रीत्यर्थ मंगलसमयी उदारहस्ते देणगी.
- समाज ऋण परत फेड.
देणगी व योजना
एक दिवशीय वेतन
समाजाच्या ४० गावच्या सभासदांकडून दर वर्षी एकदा एक दिवशीय वेतन जमा केले जाते. हा Corpus Fund दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेसाठी जपला जातो.
वैद्यकीय मदत निधी
सभासदांना गंभीर आजारांच्या प्रसंगी वैद्यकीय मदत निधीतून आर्थिक सहाय्य केले जाते.
आपत्कालीन सहाय्य निधी
नैसर्गिक आपत्ती (भूकंप, पूर, त्सुनामी), मानवनिर्मित आपत्ती व वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत सहाय्य.
शैक्षणिक मदत निधी (शिष्यवृत्ती)
गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्य पुरवठा.
सभागृह निधी योजना
समाजाच्या सामाजिक कार्यक्रमांसाठी सभागृह उभारणीस आर्थिक मदत.
श्रीमती लक्ष्मीबाई सखाराम देसाई निराधार सहाय्य (स्त्रियांसाठी)
निराधार महिलांसाठी विशेष सहाय्य योजना.
कै. विठ्ठल नागोजी जाधव सहाय्य योजना (पुरुषांसाठी)
निराधार पुरुषांसाठी विशेष सहाय्य योजना.
नोंदणी माहिती
Income Tax Rsg. No. INS/26158 dt. 21-02-1992
No. DIT(E) MC/80G/2374/2009-10
BC Trust Cell/INS 26158
AAATK3423H
Exemption under 80G of I.T. Act 1961
फोटो गॅलरी
विविध कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे छायाचित्रे.